Views


*उमरगा लोहारा मतदारसंघांमध्ये अशोकराजे सरवदे यांचा झंझावात*



लोहारा/प्रतिनिधी 


सध्या तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या पावसाच्या गारठ्या सोबतच उमरगा लोहारा तालुक्यामध्ये विधानसभेची गर्मी दिवसेंन दिवस वाढत आहे, विविध राजकीय पक्षाकडून सर्व इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या पक्षाकडून जोरदार सुरुवात केली असून या मतदारसंघांमध्ये असलेले प्रमुख राजकीय विरोधक म्हणून शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असीच लढत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेच्या शिंदें गटाकडून विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे फिक्स असल्याचे मानले जात आहे. तर त्यांना मजबूत टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून विविध इच्छुक असले तरी लोहारा तालुक्यातील अशोकराजे सरवदे यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे, कारण अशोक राजे सरवदे हे सामाजिक, चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचा या मतदार संघामध्ये मोठा जनसंपर्क आहे, गेली वीस वर्षापासूनच्या सामाजिक चळवळीमधील त्यांचे योगदान या मतदारसंघांमध्ये मोठे आहे, दोन्ही तालुक्यातील उच्च शिक्षित बुद्धिजीवी वर्गांसोबतच सामाजिक क्षेत्रातील सर्व संघटना प्रमुख यांच्याशी अतिशय जवळचे नाते आहे. अशोकराजे सरवदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच अतिशय उघड आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. याची दखल घेत 2019 मध्ये मराठा समाजाच्या वतीने अशोकराजे सरवदे यांना संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने जाहीरपणे *मराठाभूषण पुरस्कार देऊन लोहारा शहरामध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे सरवदे यांना या मतदारसंघांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांनी विविध गाव वाडी वस्ती तांडे या ठिकाणी भेटी देऊन झंझावात सुरू केला आहे. ठाकरे गटा कडून मोर्चे बांधणी करत असताना पहिल्यांदाच लोहारा तालुक्यातील उमेदवार म्हणून त्यांना मोठी पसंती लोहारा तालुक्यातुन मिळत आहे. यातूनच त्यांनी मुंबईमध्ये नोकरीमध्ये असल्यामुळे तेथेही त्यांनी आपल्या सामाजिक चळवळीशी नाळ कायम ठेवली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी अतिशय जवळीक निर्माण केली असून शिवशक्ती, भीमशक्ती, लहू शक्ती हे नवे समीकरण महाराष्ट्रा मध्ये निर्माण करण्याचा एक भाग म्हणून त्यांनी उद्धव यांच्या सोबत एक मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित केला होता. आणि त्याच कार्यक्रमातून शिवशक्ती, भीम शक्ती, लहू शक्ती चा नवा नारा सबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे उमरगा लोहारा तालुक्याचे या तिन्ही शक्तींचे समीकरण पाहिले असता अशोकराजे यांचे पारडे जड आहे असे दिसते, कारण भीमशक्ती, व लहू शक्ती एकत्र होत असल्याची कुजबुज तालुक्यामध्ये सुरू असतानाच शिवशक्तीचाही कौल त्याच बाजूने असल्याचे दिसत आहे, त्यामुळे मुस्लिम समाजालाही अशोक राजे त्यांचे सामाजिक नाते जवळचे ठरत असल्याचे दिसते आहे.भीम शक्ती, लहू शक्ती या दोन्ही शक्तींची ताकद तालुक्यामध्ये जवळपास 55 ते 60 हजाराच्या आसपास असल्याकारणाने ठाकरे गटांच्या शिवशक्तीला, विद्यमान आमदार चौगुले यांना शह देण्यासाठी हाच एक उत्तम पर्याय असू शकतो अशीही चर्चा या तालुक्यामध्ये आहे त्यामुळे अशोकराजे सरवदे, यांच्या मोठ्या संपर्कामुळे एक उच्च शिक्षित अभ्यासू आणि प्रभावी वक्ता असल्यामुळे, पंधरा वर्षे सत्तेत असणारे विद्यमान आमदार चौगुले यांना शह देणे हे अशोकराजे सरवदे शिवाय इतके सोपे नसून यासाठी सामाजिक चळवळीत काम करणारा अभ्यासू हिम्मतबाज आणि डेरिंगबाज आणि तितकाच प्रभावी आक्रमक वक्ता म्हणून असणारा उमेदवारच यांना खरी टक्कर देऊ शकतो आणि हे सर्व गुण अशोकराजें मध्ये ठासून भरले आहेत ,, अशी ही चर्चा तालुक्यामध्ये आहे. गेली लोकसभेची निवडणूक ओमराजे निंबाळकर यांनी तालुक्यातील मोठ्या फरकाने जिंकली असली तरी लोकसभेचे मुद्दे आणि विधानसभेचे मुद्दे हे वेगळे असल्याकारणाने त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या तालुक्याच्या लीडमुळे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची रांग ठाकरे गटाकडे लागली असली तरी वरिष्ठांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी अभ्यासपूर्ण सक्षम भूमिका घेणे आज गरजेचे आहे आहे अशी जनतेमध्ये चर्चा आहे. या सर्व घटनांकडे पाहिले असता अशोकराजांचे या तालुक्यामध्ये वाढता जनसंपर्काने पारडे जड होत असल्याचे दिसून येत आहे.
 
Top