*टॉवरचे साहित्य चोरणारा उच्चशिक्षित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
*2,35,000/- रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त*
*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई*
धाराशिव/प्रतिनिधी
येडशी येथील इंडस टावर कंपनीच्या टावर क्रमांक 1069862 वर लावलेला एअरटेल कंपनीचा आय वेन डिवाइस डिश अँटेना अज्ञात चोरट्याने चोरून नेला. वगैरे तक्रारींवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाप्रकारे टेलिकॉम कंपनीच्या टॉवर वरून इलेक्ट्रॉनिक उप करणे चोरीचे काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे दाखल झाले असुन
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणातून गुन्हे करणाऱ्या इसमा बाबत माहिती प्राप्त झाली. सदर बाबत सखोल तपास केला असता आंबेजोगाई तालुका जि. बीड येथील एका संशईत व्यक्तीचे नाव तपासात समोर आले त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेजोगाई तालुका जि. बीड येथे तात्काळ जावून राजेश आचार्य नावाच्या इसमाला ताब्यात घेतले. तसेच त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने तो यापूर्वी रिकाम कंपनीत इंजिनियर म्हणून कामास होता. तसेच नोकरी गेल्यानंतर पैसे कमवण्यासाठी त्याने धाराशिव जिल्ह्यातील येडशी सांजा मार्डी आणि मसला या ठिकाणी असलेल्या इंडस्ट्रावरच्या वर लावलेले इंटरनेटसाठी उपयोगी असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण 300 हे स्वतःच्या फायद्या करता चोरी केले असल्याचे कबूल केले. नमुद आरोपीने एकूण सहा उपकरणे चोरली असल्याचे तपासातून समोर आले पोलिसांनी धाराशिव जिल्ह्याचे गुन्हे अभिलेखाची तपाणी केली असता नमुद आरोपीविरुध्द चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने नमुद आरोपीकडून एकूण 1,65,000 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,35,000₹ किंमतीचा माल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस मुद्देमालासह धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही कामी हजर केले आहे.
सदरची कामगीरी धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी,चापोका -नितीन भोसले, रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.