*कळंब तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साखर उपलब्ध करा- मानव अधिकार आंदोलन संघटनेची मागणी*
कळंब /प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील अनेक अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अंदाजे ऑक्टोबर २०२४ पासून स्वस्त धान्य दुकानांमधून साखर मिळत नसल्याचे तालुक्यातील नागरिकांमधून चर्चा केली जात असल्यामुळे मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने कळंब तालुक्याचे तहसीलदार मा.हेमंत ढोकले यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कळंब तालुक्यातील एकुण १४३ स्वस्त धान्य दुकाने असुन या दुकानांमध्ये (५३१९) एवढी अंत्योदय कार्ड संख्याआहे.त्यामुळे या शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड १ कीलो प्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांना एक किलो प्रमाणे साखर मिळत होती. परंतु ऑक्टोबर (२०२४) पासून कसल्याही पद्धतीची साखर मिळत नसल्याने अनेक लाभधारक या पासुन वंचित राहत आहेत. तरी सदरील लाभधारकांना यापुढे २ किलो प्रमाणे साखर देण्यात यावी अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर कळंब तालुक्यातील किती अंत्योदय लाभधारक यांना साखर मिळालीआहे? व किती लाभधारकांना साखर मिळाली नाही. याची आपल्या मार्फत चौकशी करण्यात यावी. व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांना तात्काळ साखर उपलब्ध करून गैरसोय दुर करावी अशी मागणी मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, मानवी हक्क अभियान च्या जिल्हाध्यक्षा माया शिंदे, शहराध्यक्ष तुकाराम ताटे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण बनसोडे, तुकाराम जाधव, रामकिसन जाधवर, सिद्धेश्वर जाधवर, बंकट जाधवर,प्रवीण जाधवर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.