Views


*जि प प्रशाला खामसवाडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व आरोग्य शिबीर संपन्न.*

*विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे ही लक्ष द्यावे न्या.किरण बागे पाटील*

कळंब / प्रतिनिधी 



आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व विज्ञान युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या धड्यासोबतच व्यायामाचेही धडे घ्यावेत जेणेकरून आरोग्य व अभ्यास यांचा ताळमेळ लावून एक आदर्श नागरिक बनावे . आरोग्य चांगले असेल तर अभ्यासातही चंचलपणा येतो आरोग्य आणि बुद्धी व अभ्यास या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील आरोग्य शिबिर व कायदेविषयक शिबिरात आपले मत व्यक्त केले . खामसवाडी येथे
स्व .गोपाळ आत्माराम सोनवणे यांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ कळंब यांचे संयुक्त विद्यमाने जि . प . प्रशाला खामसवाडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व आरोग्य शिबीर संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष किरण ए .बागे-पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठस्तर चे न्यायाधिश एन . ए . इंगळे हे होते यांनी  
तर प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून कळंब न्यायालयाचे न्यायाधीश आर .पी .बाठे , न्यायाधिश एम . के . शेख विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. डी .एस .पवार ,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . सौ . मंजुषा शेळके ,महाराष्ट्रा आय .एम .ए . चे माजी अध्यक्ष .
 डॉ . रामकृष्ण लोंढे यांची उपस्थिती होती. खामसवाडी येथील सरंपच अमोल पाटील , विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी खामसवाडी, चे चेअरमन संजय पाटील . तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सोनवणे परिवारातील सदस्यांनी आयोजित केला होता.
  न्या . किरण बागे-पाटील यांनी उपस्थित जनसमुदायास कायदेविषयक मार्गदर्शन सविस्तर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड .डी . एस . पवार यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ . अशोक शिंपले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक डी . एफ . रसाळ , गोरे जी . आर, राठोड ए . डी, कोकाटे ,एस यु,सोनवळकर ,आर. पी,वाघ , एन एल,सुरवसे, टि .एच,लोंढे एस . सी, सुरवसे , एस . एम, वाघमारे ,बी जी ,जाधव , ए. जीवन भंडारे ,व्हि . आर,श्रीमती लिंबोरे एस . एम,श्रीमती कदम एस . आर, यांनी परिश्रम घेतले.
तर या कार्यक्रमासाठी कळंब न्यायालयातील ॲड. डी . एस . पवार, ॲड. विशाल दुगाणे, ॲड. रामेश्वर दार्शेवाड, ॲड. एस . आर .आगलावे, ॲड. सचिन जाधवर, ॲड. एम . डी .पंडित, ॲड .उद्धव शेळके, ॲड .गोरख कस्पटे, ॲड. एस .एस . पवार, ॲड .अशोक चोंदे, ॲड .सी . बी . बिक्कड, ॲड .संकेत कणसे, ॲड .अमर पायाळ, ॲड. अजिंक्य शिंदे, ॲड अनंत कोल्हे, ॲड .अभिमन्यु लोकरे. सह आदी मान्यवर उपस्थित होते . 


             चौकट


या आरोग्य शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांसह १४० नागरिकांनी डोळे ,मधुमेह व इतर आरोग्याची तपासणी करून लाभ घेतला या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . मंजुराणी शेळके, तालुका वैद्यकीय आधिकारी डाॅ.सय्यद, डाॅ. पुरूषोत्तम पाटील, डॉ. भक्ती गीते, डाॅ. मोहळकर,डाॅ. प्रशांत जोशी, डाॅ आडसुळ , डॉ . मुकराम जागीरदार ,औषधनिर्माण आधिकारी विजय यादव, अश्विनी बाबर,तोरड , आयसीआयसीआय समुपदेशक प्रगती भंडारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईश्वर भोसले, श्रीमती राऊत, श्रिमती सलगरे ,श्री. मुंजाजी शिखारे, सदाफुले, बालाजी चव्हाण आणि गावातील आशाताई . आदी सहभागी झाले होते .

 
Top