*23 फेब्रुवारी रोजी कळंब शहरात साजरा होणार श्री संत रविदास महाराजांचा जयंती उत्सव*
*माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांची राहणार विशेष उपस्थिती*
*जिल्हातील चर्मकार समाज मोठया संख्येने उपस्थित राहणार *
*विविध क्षेत्रातील गुणवंताचा गुणगौरव सोहळा*
कळंब/प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ कळंब तालुका आयोजित श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव 2025 मोठया उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने कळंब येथे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांच्या आयोजनाने दिनांक 23 फेब्रुवारी 2025 सकाळी 10.30 वाजता संत रोहिदास जयंती उत्सव, चर्मकार समाज मेळावा व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे. सर्वप्रथम ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली पाखरे महाराज आपेगावकार यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडेल. या कार्यक्रमासाठी माजी समाज कल्याणमंत्री श्री. बबनराव घोलप, तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, शिवसेना नेते अजित पिंगळे, धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, विजयप्रकाश ठोंबरे, प्रतापसिंह पाटील , संजय मुंदडा, राजेंद्र शेरखाने यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे सर यांनी केले आहे.