Views


*तालुका पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद....हेमंत ढोकले*

*शिवभूषण पुरस्कार गुलाब महेबुब शेख यांना प्रदान* 




कळंब/प्रतिनिधी 


कळंब तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम कौतुकास्पद असून, पुरस्काराने काम करण्याची उर्मी वाढते व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले.        
   या वेळी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा शिवभूषण पुरस्कार, जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात भाटशिरपूरा येथील शिवभक्त गुलाब महेबुब शेख यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पुरस्कारा मध्ये शाल, श्रीफळ, सन्मानपत्र,ऊर्जस्तंभ पुस्तक देण्यात आले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार हेमंत ढोकले,ह.भ. प.महादेव महाराज, मा. नगरसेवक प्रताप मोरे, स्वप्न नगरी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल माने, कथले युवक आघाडी चे बाळासाहेब कथले, सुमित बलदोया,यश सुराणा , शिवाजी गीडे, आदी उपस्थित होते.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तहसीलदार हेमंत ढोकले , बाळकृष्ण तांबारे यांनी पत्रकार संघ राबवत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून, या मागची भूमिका विषद केली .सूत्र संचलन माधवसिंग राजपूत यांनी केले, तर आभार सतीश टोणगे यांनी मानले.
     या वेळी शितलकुमार घोंगडे,परमेश्वर पालकर, श्याम जाधवर,दिलीप गंभीरे, राजे सावंत,बालाजी अडसूळ, प्रवीण तांबडे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

 
Top