Views


*स्वप्ननगरी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप टोणगे,उपाध्यक्ष अनिल शेळके तर सचिव म्हणून ज्योतिबा मुंडे यांची नियुक्ती* 

*स्वप्ननगरी सोसायटीची कार्यकारिणी जाहीर*


कळंब /प्रतिनिधी



कळंब येथील स्वप्ननगरी सोसायटीची स्थापना करण्यात आली असून या सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप टोणगे, उपाध्यक्ष अनिल शेळके तर सचिव म्हणून ज्योतिबा मुंडे यांची नियुक्ती सर्वानुमते  करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून ॲड.तानाजी चौधरी, हरिभाऊ मोरे, प्रसाद सोहनी,मनीषा कांबळे,शोभा माने,सचिन बोंदर,नितीन भाले,भागवत चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

 कार्यकारिणी निवडीच्या बैठकीप्रसंगी डॉ.रमेश जाधवर,विठ्ठल माने,महादेव खराटे,बाबासाहेब कांबळे,राजेंद्र बिक्कड,प्रा.सतिश मातने, परमेश्वर पालकर,सागर बाराते,अमोल पवार यांची उपस्थिती होती.ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व पुढील काळात स्वप्ननगरी सोसायटीच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या या संदर्भातही चर्चा झाली.

 
Top