Views


*रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव व सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* 

*बोलक्या बाहुल्या च्या माध्यमातून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन* 


धाराशिव/प्रतिनिधी 

रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव व सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपविद्यापीठ  परिसर धाराशिव येथे वाहतूक नियमनाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला
मंगळवार (दि.21) रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव व सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपविद्यापीठ  परिसर धाराशिव येथे वाहतूक नियमनाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून  प्रा. डॉ. गोविंद कोकणे,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपविद्यापीठ  परिसरात, प्रमुख मार्गदर्शक श्री वसंत पाटील, संचालक सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे, प्रमुख उपस्थिती प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि प धाराशिव चे श्री उदयसिंह रामराव पाटील  प्रमुख पाहुणे म्हणून , धाराशिव मोटार वाहन निरीक्षक श्री एम.जी. शेख धाराशिव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे,  सदर कार्यक्रमांमध्ये महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निशिकांत शिंदे  यांनी वाहतूक नियमनाबाबत उपस्थिती विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री वसंत पाटील यांनी विद्यार्थी यांना वाहतुकीचे शिस्त कशी पाळावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.  सदर कार्यक्रमांमध्ये श्री उदयसिंह रामराव पाटील यांचा बोलक्या बाहुल्या कार्यक्रम हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याचे कारण असे की त्यांनी सदर बोलक्या भावल्याच्या माध्यमातून  उपस्थित विद्यार्थी यांना वाहतूक नियमानाबाबत प्रचार व प्रसार करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा बाबत प्रतिज्ञा देण्यात आली. सदरचा कार्यक्रम हा महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव यांच्या निशिकांत शिंदे मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस   येथील पोलीस अमलदार अमोल खराडे, बालाजी तोडकर, संतोष वाडकर, अमोल कलशेट्टी, प्रवीण खटके, दत्ता यादव, कुणाल दहीहंडी, प्रशांत म्हैत्रे, अमर माळी, किशोर हरभरे यांनी पूर्ण केला.





 
Top