*दोन वर्षा पासून फरार असलेला आरोपी आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात*
*धाराशिव शहरातील दोन घरफोडी मध्ये होता सहभागी असलेला आरोपी सोलापूर जिल्ह्यातून जेरबंद*
*आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जाधव यांच्या पथकाने केली कारवाई*
धाराशिव /प्रतिनिधी
शहरातील जुना उपळा रोड परिसरातील झालेल्या दोन घरफोडीतील दोन वर्षा पासून फरार असलेला आरोपी आनंदनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील उंडेगाव ता. बार्शी येथून ताब्यात घेतले
जुना उपळा रोड परिसरात दोन वर्षा पूर्वी एकाच रात्री चार अज्ञात चोरांनी दोन घर मध्ये प्रवेश करून घरातील दागिने, रोख रक्कम असे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल घेऊन फरार झाल्याची घटना घडली होती आनंदनगर पोलिसांनी तपास चक्र फिरवत तीन आरोपी अटक करण्यात आली होती . त्यापैकी एक आरोपी फरार होता. संबंधित आरोपी बाप्पा वशिला शिंदे रा उंडेगाव ता बार्शी जि सोलापूर हा स्वतः च्या राहत्या घरी असल्याचे आनंदनगर पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली आसता पथक प्रमुख आनंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश जाधव यांनी पथका सह उंडेगाव ता बार्शी जि सोलापूर येथे सोमवार (दि.04) रोजी जाऊन बाप्पा वशिला शिंदे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने धाराशिव येथील जुना उपळा रोड परिसरातील दोन घरफोडी मध्ये सहभागी असल्याचे कबूली दिली आरोपीला मंगळवार (दि.05) रोजी धाराशिव न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन धाराशिव पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जाधव, पोलिस हवालदार सचिन कपाळे,गुलचंद गंगावणे,आजर काझी,प्रशांत मैंद्रे, पोलिस नाईक सचिन खंडेराव,कैलास सोनवणे,मनोज गोबाडे, महिला पोलिस नाईक कुसुम जाधवर यांनी केली