*आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस, व बीएसएफ जवानांचे पथसंचलन*
धाराशिव/प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बिल्डिंग चौक, जिजाऊ चौक, बार्शी नाका मार्गावरून आनंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवार ( दि.02) रोजी दुपारी पथसंचलन करण्यात आले
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बिल्डिंग चौक, जिजाऊ चौक, बार्शी नाका मार्गावरून आनंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने पथसंचलन करण्यात आले यावेळी धाराशिव पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, परमेश्वर सोंगे यांच्या सह आनंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व बीएसएफ जवान तकडीचे सहभाग होता