धाराशिव /प्रतिनिधी
शहरातील जुना उपळा रोड परिसरातील रहिवासी सागरबाई गुलाबराव देशमुख वय 60 वर्ष ह्या 25/08/2023 रोजी घरात कोणाला ही न सांगता निघून गेलेल्या आहेत अशी तक्रार सागरबाई गुलाबराव देशमुख यांचा मुलगा काशिनाथ गुलाबराव देशमुख यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात 26/08/2023 रोजी दिली असून तक्रारी नुसार मिसिंग नं 34/2023 हरवल्याची नोंद करण्यात आली सदर महिलेचे धाराशिव, लातुर जिल्हा, सोलापूर जिल्हा तसेच इतरत्र नातेवाईकांनी व पोलिसांनी शोध घेतला असता ती अद्याप पर्यंत मिळून आलेली नाही पुढील वर्णनाची महिला कोणाला ही आढळून आल्यास आनंदनगर पोलिस ठाण्याचे महिला पोलिस हवालदार आर.एस. नादाफ आनंदनगर पोलिस ठाण्यात 94224 67234, 02472223203 या नंबर वर कळवावे
वर्णन
हरवलेल्या महिलेचे संपूर्ण नाव - सागरबाई गुलाबराव देवकर वय 60 वर्षे
उंची अंदाजे 5 फुट
रंग -गोरा
बांधा -सडपातळ
नाक-सरळ
केस- काळे, पांढरे व लांब
कपडे -अंगात पिवळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज
बोली भाषा- मराठी
कपाळावर कुंकवाचा डाग, हातात काचेच्या बांगड्या