*डिकसळ ग्रामपंचायतच्या कार्यालय समोर कचराच कचरा*
*गावातील स्वच्छते कडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष*
*ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील महत्त्वाची तसेच शहरालगत असलेले डिकसळ गावातील स्वच्छते प्रश्न निर्माण होऊन ग्रामस्थांनचे आरोग्य धोक्यात आले आहे डिकसळ ग्रामपंचायत येथील सदस्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छते वारंवार सांगून देखील कचरा न उचलण्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आक्रमक होऊन डिकसळ ग्रामपंचायत कार्यालय समोर ओला व सुका कचरा आणून टाकत ग्रामपंचायत प्रशासनाचे निषेध नोंदविला
याबाबत सविस्तर माहिती अशी कि कळंब तालुक्यातील आर्थिक बाबी अंतत्य महत्त्वाचे असलेले डिकसळ गाव आहे गावातील व प्रभाग क्र चार येथील कचरा व्यवस्था करण्यासाठी वारंवार ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सुचना केल्या परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने हे गाव स्वच्छते कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने प्रभाग क्रमांक 4 येथील मेजर काळे खूप दिवसापासून खूप मोठा कचरा साचला होता.
ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला मोबीन मन्यार व रफिक सय्यद यांच्याशी संपर्क साधून मागणी केली या ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ सरपंच ग्रामसेवक व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कचरा उचलून नेण्याची विनंती केली. अन्यथा हाच कचरा ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकू असे आवाहन देखील देण्यात आले होते
परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या भागातील नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत होता हीच बाब लक्षात घेऊन आज एक्सल ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला रफिक सय्यद मुबीन मनियार यांनी हाच कचरा डिकसळ ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकला आहे