*मोहा येथून देशी बनावटीचे गावठी कट्या सह एक जिवंत काडतुस जप्त*
*आरोपी तरूण पळून जाण्यात यशस्वी*
धाराशिव/प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील मोहा येथील पारधी समाजाच्या तरूणा जवळ देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मंगळवार ( दि 29) रोजी कळंब पोलिसांना मिळाली यांची गांभीर्याने घेत पोलीसांचे दोन पथक नियुक्त करून मोहा येथील पारधी वस्ती वर पोलिस पोहोचले असता पोलिसांना बघुन संशयित तरुण पळून गेला त्याने पळून जात असताना स्वतः जवळील काही तरी गवता मध्ये टकल्याचे पोलिसांना दिसले शोध घेतला असता गवता मध्ये एक लोखंडी देशी बनावटीचे गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस मिळून आले
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोपनीय माहिती काढून अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मोहा येथील पारधी पिढी येथे राहत असलेला शाहाजी ऊर्फ कड्या बिरु काळे हा स्वतः जवळ अवैध रित्या देशी गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगून गावा मध्ये फिरत आहे. अशी माहिती कळंब पोलिसांना मिळाली तत्काळ पोलिस पथक मोहा येथे गेले संशयित तरुण हा पोलिसांना बघुन पळून जात असताना त्याने त्याच्या जवळ गावठी कट्टा शेतात बांधावर गवता मध्ये टकल्याचे पोलिसांना दिसले पोलिसांनी शोध घेतला असता 1 देशी बनावटीचे गावठी कट्टा (पिस्तूल) व 1 जिवंत काडतुस अंदाजे एकूण 25,500/- रुपयाचे पोलिसांनी जप्त केले मात्र आरोपी शहाजी ऊर्फ कड्या बिरु काळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला त्याच्या वर कळंब पोलिस ठाण्यात भारतीय शस्र कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप यांच्या नेतृत्वाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, पोलिस हवालदार शिवाजी राऊत , पोलिस नाईक मनोज दळवे, दत्तात्रय शिंदे, चालक पोलिस नाईक इरफान शेख यांनी केली