Views


*डॉ. सुशील सुरेश लंगडे यांनी वैयक्तिक स्वतः जातीने लक्ष देऊन महिलेचे वाचविले जिव*

*कळंब तालुक्यातील गौर चे सुपुत्र डॉ. सुशील सुरेश लंगडे यांनी यमल अडसूळ यांना वैयक्तिक स्वतः च्या निगरानीत उपचार केले*

धाराशिव/ प्रतिनिधी 

वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील यमल अडसूळ वय 50 वर्ष यांना 25 सप्टेंबर रोजी छातीत दुखत असल्याने बार्शी येथील जगदाळे मामा हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते यमल अडसूळ यांना छातीत दुखत होते तसेच धाप लागण्याचे त्रास ही होते कळंब तालुक्यातील गौर चे सुपुत्र डॉ. सुशील सुरेश लंगडे यांनी यमल अडसूळ यांना वैयक्तिक स्वतः च्या निगरानीत उपचार देत रक्त , लघवी आणि एक्स रे तपासणीनंतर त्यांना तीव्र इन्फेक्शन व त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होऊन हृदयाचे ठोके वाढले असल्याचे निदान झाले . योग्य प्रतिजैविक( antibiotics) व इतर सर्व उपचार डॉ. लंगडे यांच्या देखरेखीखाली चालू झाले . ईसीजी आणि इको तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयाच्या valve चा आजार Mitral Stenosis असल्याचे निदान अनुभवी हृदयविकार तज्ञ डॉ.आदित्य साखरे यांनी केले व इंजेक्शन चालू केले. काही दिवसानंतर ICU मधे असतानाच हृदयाचे ठोके 200 च्यावर गेल्याने तातडीने Electric-Cardio version म्हणजेच शॉक देण्याचा निर्णय डॉ.साखरे व डॉ.लंगडे यांनी घेतला . त्यात ७-८ वेळा शॉक दिल्यानंतर हृदयाचे ठोके पूर्ववत झाले. व्हेंटिलेटर ची आवश्यकता सुद्धा लागली नाही.यात स्टाफ भागवत जगताप , शिंदे यांनी उत्तम सहकार्य केले. ४-५ दिवस ICU मधे ठेवल्यानंतर पेशंट ला वॉर्ड व नंतर डिस्चार्ज करण्यात आले . अशाप्रकारे इतक्या गंभीर आजारातून पेशंट चा जीव सुखरूप वाचवण्याचे काम डॉ.लंगडे व डॉ.साखरे यांनी केले. 

डॉ सुशील लंगडे हे मूळचे कळंब तालुक्यातील गौर येथील . दहिफळ, गौर या भागातच शालेय शिक्षण झाले . नंतर भोसले हायस्कूल धाराशिव व शाहू कॉलेज लातूर येथे. नंतर MBBS MD पुणे येथे एक वर्ष ICU तज्ञ म्हणून अनुभव . या भागातील परिस्थिती माहित असल्यामुळे गरीब गरजू या रुग्णाला कमीत कमी दरात antibiotics , रक्ताच्या तपासण्या यात मदत करण्यात आली . 




जगदाळे मामा हॉस्पिटल , बार्शी येथे सर्व प्रकारच्या आजारावर माफक दरात निदान व उपचार होतात . ICU , वॉर्ड , ऑपरेशन थिएटर सर्व उपलब्ध असून गरजू रुग्णांनी अशा तज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.


डॉ. सुशील लंगडे MBBS MD
जगदाळे मामा हॉस्पिटल , बार्शी




 
Top