*भूम येथे मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन व पुस्तक प्रकाशन संपन्न...*
धाराशिव:-(प्रतिनिधी )
मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भुम येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन यश मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यामध्ये विविध मान्यवरांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली वाहुन करण्यात आली.
मुस्लिम एकता संगटनेचे संस्थापक अध्यक्ष असिफ जमादार यांनी संघटनेच्या माध्यमातुन अल्पावधी काळात विविध सामाजिक कार्यातुन संघटनेचे नाव लौकिक केले आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचा आगळा वेगळा संदेश संघटनेच्या माध्यमातुन दिला आहे.
यावेळी भूम नगरीचे विकासरत्न माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी मुस्लिम एकता संघटनेला सामाजिक कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व वस्ताद नवनाथ आप्पा जगताप यांनी संघटनेचे कौतुक केले.
आरोग्यदुत राहुल घुले सरांनी मुस्लिम एकता संघटनेला महाराष्ट्रात आरोग्य सेवा मोफत करण्याचे आश्वासन दिले. न्यायालयीन व शिक्षण कामकाजात संघटनेला महाराष्ट्रात जफर जिनेरी यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. शेवटी सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष जिनत सय्यद यांनी आसिफ जमादार यांनी मुस्लिम एकता माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले.
सदर सामाजिक कार्यक्रमाला उस्मानाबाद, भूम, परंडा,बिड वाशी, पुणे, सोलापूर, बार्शी, करमाळा, माढा, कुर्डूवाडी, चिंचपूर ,वालवड ,शेखापुर, चुंबळी, तडवळा नळदुर्ग आदि भागातुन हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे मुस्लिम एकता सोलापूर जिल्हा अध्यक्ष रफिक खान, पुणे जिल्हा अध्यक्ष बाबु मुलांनी ,मार्गदर्शक गौस शेख, शहराध्यक्ष जफर पठाण व तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आलिम सर यांनी केले.
याप्रसंगी कादर खान, अलीम मौलाना नळदुर्ग,बुबुकर जमादार, बबलू बागवान ,माजी नगराध्यक्ष शाकीर शेख , कोहिनूर सय्यद, रामराजे साळुंखे, राजू खान, बाबा कुरेशी वाशी, सद्दाम काजी लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई साठे, रेश्मा शेख पुणे ,जुबेर बागवान ,साबेर खान ,अज्जू जमादार, शब्बीर सापवाले,पैलवान अखिलेश जमादार उपस्थित होते.