Views


*भूम परंडा वाशी चे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन*

धाराशिव /प्रतिनिधी 


भूम-परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दिनांक 02 ऑक्टोबर रोजी रात्री 10:27 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ज्ञानेश्वर पाटील हे कडवट शिवसैनिक होते, पक्ष संघटनेची एकनिष्ठता व सामान्य गोरगरीब जनतेची प्रश्ने मार्गी लावण्याची धडपड पाहता दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना विधानसभेची संधी दिली होती. ते विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता त्यांनी भुम परंडा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली ज्ञानेश्वर पाटील यांच्या असे अचानक जाण्याने भूम परंडा मतदानसंघ पोरखा झाला 

03 ऑक्टोबर रोजी दुपारी परंडा येथे ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असून सकाळी 10 ते 12 दुपारी वाजेपर्यंत त्यांचे शरीर अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवले जाणार आहे.
 
Top