Views


*गांज्याची अवैध विक्रीसाठी लागवड करून जोपाणा करणाऱ्या शेतकऱ्या विरुध्द कळंब पोलीसांची कार्यवाही*


कळंब/ प्रतिनिधी 

तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) परिसरातील एका शेतकऱ्याने स्वतः च्या वडीलांच्या नावे जमीन गट नंबर 105 मधील जमीन मध्ये गांज्यांची झाडे लावली असल्याचे कळंब पोलिस प्रशासनाला रविवार (दि.27) रोजी गुप्त माहिती मिळाली यांची गांभीर्याने दखल घेत कळंब पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप यांनी एक पथक नेमणूक करून पिंपळगाव (डोळा) हद्दीतील जमीन गट नंबर 105 मधील जमीन मध्ये चार गांज्यांची झाडे आढळून आली यावेळी शेतकरी अमर अंकुश टेकाळे रा पिंपळगाव (डोळा)ता.कळंब जि. धाराशिव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गांज्यांची झाडे लाऊन त्याची अवैध मार्गाने विक्री करण्यासाठी लावल्याचे समोर आले असल्याचे पोलीस प्रशासन कडून सांगण्यात आले यावेळी सदर कार्यवाही मध्ये 6.108 किलो ग्रॅम वजनाचा एकुण 1,22,160/- रुपये किंमतीचा गांजा जप्त करुन अमर टेकाळे यांचे विरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 (क), 20 (क) अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला 

सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन तसेच कळंब उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रवी सानप, यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर पोलीस उपनिरीक्षक शिंदे कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार शिवाजी राऊत, मनोज दळवी, पोलिस नाईक अजिज शेख, अमोल माळी,किरण माळी, फुलचंद मुंडे, आसाराम खाडे साईनाथ आशमोड, महिला पोलिस कॉन्स्टेबल संजीवनी वडकर, पोलिस चालक इरफान शेख यांचे पथकाने केली.






 
Top