*गणेश उत्सवाबरोबर जेष्ठ गौरी महालक्ष्मी पुढे आकर्षण रोषणाई, सजावट, व आरास करून पूजन करण्यात आले*
धाराशिव/प्रतिनिधी
गणेश उत्सव,ईद, महापुरुषांची जयंती किंवा ईतर सण उत्सव असले कि पोलिस हे बंदोबस्तासाठी नेहमी तयार असतात मग ते पुरुष असो कि महिला ते स्वतः च्या कुटुंब सोडून वरीष्ठांच्या आदेश अले कि बंदोबस्तासाठी जावे लागते पोलिसांना कधीच आपल्या परिवारा सोबत सण उत्सव साजरा करण्यास मिळत नाही
मंगळवार गौराई ची घरोघरी उत्साहात आगमन झाले यानंतर बुधवारी महापुजा मांडून पुरणपोळीसह फराळाचे नैवेद्य दाखवण्यात आले
पोलिस प्रशासनामध्ये महिला कर्मचारी ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सण उत्सव बंदोबस्त करत असतात एवढ्या धावपळीतून धाराशिव मुख्यालय कार्यरत असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा सूर्यकांत वाघमारे यांनी गौराई समोर आकर्षण सजावट केली.