*सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...*
कळंब/ प्रतिनिधी
धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या S T आरक्षनाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे गेली तिन दिवस झाले धनगर समाजातील काही बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत . उपोषणाच्या चौथ्या दिवशी काही उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली आहे .
तरीही अद्यापही या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तरी शासनाने तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन मागणी मान्य करावी.
या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मुस्ताक खोंदे यांना देण्यात आले..
या निवेदनावर सकल धनगर समाज कळंब तालुक्यातील समाज बांधवांच्या सह्या आहेत...