*“पोलीस काका व पोलिस दिदी” या उपक्रमा चे आयोजन करण्यात आले.*
कळंब/ प्रतिनिधी
तालुक्यातील हनुमान विद्यालय घारगांव येथे धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या संकल्पनेतून कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली “पोलीस काका व पोलिस दिदी” या उपक्रमा चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.अरुण जाधवर सर ,प्रमुख पाहुणे शिराढोण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कल्याणजी नेहरकर ,पोलीस हेडकाँन्स्टेबल श्री.सचिन गायकवाड ,पोलीस हेडकाँन्स्टेबल श्री.काकासाहेब शेंडगे महिला पोलिस नाईक वर्षा वाळवे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस हेडकाँन्स्टेबल सचिन गायकवाड यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुरक्षेविषयी तसेच गुड टच - बॅड टच ,आत्मसंरक्षण इ. विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,
शिरढोण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कल्याणजी नेहरकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी चर्चेच्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन केले.
तसेच महिला पोलिस दिदी पोलीस नाईक वर्षा वाळवे यांनी विद्यार्थिनींना चर्चेच्या माध्यमातुन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी ,शिक्षक,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.कांबळे सर यांनी केले.