*तरूणांकडू गावठी पिस्तूल जप्त*
*तरूणांना सह तीघांवर गुन्हा दाखल*
धाराशिव/ प्रतिनिधी
परंडा शहरातील एका तरुणाने हातात पिस्तूल घेतलेला फोटो स्वतः च्या व्हाॅटस्प प्रोफाईल ठेवलेला असून त्या तरुणांकडे पिस्तूल असल्याची माहिती शुक्रवार( दि 30) रोजी रात्री परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांना मिळाली यांची गंभीर दखल घेत परंडा पोलिस ठाण्याचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमून पिस्तूल हातात घेऊन फोटो स्वतः च्या व्हॅटस्प प्रोफाइल ठेवणाऱ्यां तरूण चे शोध घेत अटक करण्याचे आदेश दिले यावर थोडा ही विलंब न करता महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी तपास चक्र फिरवली असता
परंडा शहरातील शहाजी माळी याने पिस्तूल हातात धरुन फोटो काढून स्वतः च्या व्हॅटस्प प्रोफाइल ला ठेवलेला आहे. सदरील फोटो पाहून तरुण हा शहाजी माळी आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने यावर परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने शहाजी माळी यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला लावलेली गावठी पिस्तूल मिळून आली. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील गावठी पिस्तूल जप्त करुन महिला पोलिस हवालदार जिज्ञासा पायाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहाजी माळी, ऋषीकेश गायकवाड, ओंकार सुतार यांच्या विरुध्द यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिस ठाण्यात गुरनं 174/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 3(5) भारतीय न्याय सहिंता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे करीत आहे
सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, भूम पोलिस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे चे पोलीस निरीक्षक श्री विनोद ईज्जपवार, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता मुसळे, महिला पोलिस हवालदार जिज्ञासा पायाळे, पोलिस हवालदार फिरोज शेख, नितीन गुंडाळे, पोलिस अंमलदार भांगे, पोलिस नाईक राहुल खताळ, रजत चव्हाण, साधू शेवाळे, गायकवाड, काकडे, कोळेकर यांचे पथकाने केली आहे.
आरोपी कडून जप्त करण्यात अलेली गावठी पिस्तूल