*ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लोहारा ची 2 री वार्षिक सर्वसाधारण सभेसह तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावाही संपन्न*
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि.शाखा लोहारा 2 री वार्षिक सर्वसाधारण सभा व लोहारा तालुका महिला सक्षमीकरण स्नेह मेळावा लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.26 सप्टेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवतीसेना मराठवाडा निरीक्षक तथा ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन ॲड. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले या तर कार्यक्रमाचे उदघाटन सौ.शिवाई किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी युवती सेना मराठवाडा निरीक्षक तथा संस्थेच्या चेअरमन ॲड.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी सर्वसाधरण सभेचे वार्षिक अहवाल सादर केले. तसेच सौ.शिवाई किरण गायकवाड व जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव यांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जयभवानी महिला बचत गट तोरंबा, महिला बचत गट जेवळी, लक्ष्मी महिला बचत गट लोहारा, वैष्णवी महिला बचत गट लोहारा, हुसेना महिला बचत गट लोहारा, माऊली बचत गट खेड, मैत्री महिला बचत गट लोहारा, ज्ञानज्योती महिला बचत गट लोहारा, आदी महिला बचत गटांनी विहित मुदतीत विना विलंब कर्ज परतफेड केल्याने मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व 3 महिला बचत गटांना प्रत्येकी अडिच लाख रुपये याप्रमाणे कर्ज वाटपाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमस्थळी सभागृहाच्या बाहेरच्या बाजूस स्टॉल लावुन स्पर्श उपजिल्हा रुग्णालय सास्तूर व राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस (काविळ) नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत महिला व पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर, उमेद महाराष्ट्र राज्य जिवनोण्णत्ती अभियान स्वंयसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन, शासकीय योजना नोंदणी कक्षामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजना याची माहिती नागरिकांना देत त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटनेत्या तथा व्हाईस चेअरमन सारिका बंगले यांनी केले तर सुत्रसंचालन सुधीर येणेगुरे व आभार संस्था उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी मानले. या कार्यक्रमास लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, नगराध्यक्षा तथा संचालिका वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव, गटनेत्या तथा व्हाईस चेअरमन सारिका प्रमोद बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, सचिव मिरा अविनाश फुलसुंदर, संचालिका सौ. सूनिता अरुण जगताप, सौ.मुक्ताताई राजेंद्र भोजने, नगरसेविका तथा संचालिका सुमन दिपक रोडगे, संचालिका मुमताज अमिन सुंबेकर, नगरसेवक अमिन सुंबेकर, नगरसेविका कमल राम भरारे, नगरसेविका शामल बळीराम माळी, नगरसेविका शमाबी आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका आरती गिरी, नगरसेविका संगीता किशोर पाटील, नगरसेवक गौस मोमिन, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, ओम कोरे, दिपक रोडगे, के.डी.पाटील, प्रशांत थोरात, नगरसेवक विजयकुमार ढगे, इंद्रजित लोमटे, नगरसेवक आरीफ खानापुरे, उपाध्यक्ष विजय वडदरे, राजेंद्र माळी, कोषाध्यक्ष अमर देशटवार, अरुण जगताप, संदिप जगताप, बबनगीरी महाराज उंडरगावकर, विनय यादव मुंबई, प्रा. शहाजी जाधव, उपसरपंच बबन फुलसुंदर, शाखा प्रमुख रमेश जाधव (नागूर), कुंडलिक सुर्यवंशी, परमेश्र्वर साळुंके, प्रशांत थोरात, सहदेव गोरे, ज्ञानेश्वर माऊली महाराज तोरंबकर, विनोद मुसांडे, सुरेश दंडगुले, सहदेव गोरे, कुंडलिक सुर्यवंशी, लक्ष्मण भुजबळ, राजेंद्र माळी, व्यंकट माळी, अशोक माळी गुरुजी, व्यंकट पाटील, शेखर सुर्यवंशी, कुलदीप गोरे, जितेंद्र कदम यांच्यासह शहर व तालुक्यातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.