
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प, सध्या 90 % जलसाठा झाला असुन मागील दोन दिवसांत निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पात वेगाने पाणी येत आहे. याबाबत आ.ज्ञानराज चौगुले यांनी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून आढावा घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन प्रकल्पातुन कोणत्याही क्षणी तेरणा नदीपात्रात पाणी सोडावे लागू शकते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले आहे. तरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिक व शेतकरी बांधवांनी दक्ष रहावे. नदीकडे जाऊ नये व आपली जनावरे व मालमत्ता आदी नदीकाठाहून दुर न्यावे. सदर बाबीकडे आ. चौगुले लक्ष ठेवून आहोत. तरी कोणत्याही स्वरूपाची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी त्वरीत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहान उमरगा लोहारा तालुक्याचे आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.