धाराशिव/ प्रतिनिधी
धाराशिव शहर, सोलापूर ,लातूर, बीड, जिल्ह्यामधील विविध प्रकारच्या 32 गुन्ह्यात हवा असलेला आरोप धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव शहरातील धारासुर मर्दानी मंदिर परिसरात छापा टाकून दोन अटल गुन्हेगारांना अटक केली
धाराशिव शहरात नाव बदलून राहत असलेला अट्टल गुन्हेगार हे शहरातील काकानगर येथे नाव बदलून राहत असल्याचे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यावर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून धारासुर मर्दानी मंदिर परिसरात छापा टाकून सुनील ऊर्फ काळ्या श्रावण शिंदे व त्याचा भाऊ साथीदार कृष्णा श्रावण शिंदे दोघे रा सुंभा ता.जि धाराशिव यांना धाराशिव येथील काकानगर येथून ताब्यात घेतले त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता या दोघांनी व त्यांचे इतर तीन साथीदार यांनी मिळून चालू वर्षात धाराशिव तसेच सोलापूर व लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोडी व जबर चोऱ्या केल्या असल्याचे कबूल केले. या दोघांनवर ढोकी पोलिस ठाण्याचे गुन्हा दाखल असून
धाराशिव शहरासह जिल्ह्यात गुन्हे अभिलेख पाहता त्यांच्या वर 19 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले त्यांच्या ताब्यातुन एकूण 1,20,100 रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच धाराशिव शहर, सोलापूर,लातूर बीड जिल्ह्यातील विविध एकूण 32 गुन्ह्यात दोघे आरोपी पाहिजे असल्याचे समोर आले आहे पुढील कार्यवाही करण्यासाठी दोघांना मुद्देमाल सह ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वल्लीवुल्ला काझी पोलिस हवालदार शौकत पठाण जावेद काझी फरहान पठाण महिला पोलिस हवालदार शैला टेळे,शोभा बांगर,पोलिस नाईक सावंत, पोलिस अंमलदार साई आशमोड, कोळी, पोलिस महिला कॉन्स्टेबल होळकर, चालक भोसले, पोलिस अंमलदार डोंगरे यांच्या पथकाने केली