Views


*लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे नृसिंह प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने गुणवंताचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*


लोहारा/प्रतिनीधी



लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा  नृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उपसरपंच
विजय लोमटे व ग्रामस्थांच्या वतीने गुणवंताचा गुण गौरव सोहळा दि.10 ऑगस्ट 2024 घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.ज्ञानराज चौगुले होते तर प्रमुख म्हणुन पो.नि.अजित चिंतळे, लातुरचे तहसीलदार सौरभ जाधव, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, माजी गटनेते अभिमान खराडै, सरपंच अभिमान कांबळे, राजेंद्र माळी, अरुण जगताप, नगरसेवक अविनाश माळी, अदि उपस्थित होते. यावेळी कृष्णाई उळेकर युवा भारुडकार व देविदास सौदागर साहित्यिक उसवन कादंबरीचे लेखक साहित्य कला अकादमी पुरस्कार विजेते यांचा मानपत्र देऊन आ.ज्ञानराज चौगुले व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. इय्याता 10 वी 12 वी मध्ये चांगल्या मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व तसेच MBBS निट परिक्षेत 600 मार्कच्या पुढील विध्यार्थीचा व त्यांच्या माता पित्याचा सत्कार करण्यात आला. त्या मध्ये 
1- अभय अमोल जगताप 666 गुन 
2 - शेख जरियाब जैहरूद्दीन 662
3 - तनविर गुनवंत वाघमोडे 662
4 - ओंकार संतोष माडजे  625
 सेट परिक्षा उत्तीर्ण होवुन बार्शी येथे कार्यरत असलेला प्राध्यापक कृष्णात मच्छिंद्र माळी यांचाही मता पित्या सह सत्कार करण्यात आला. तुतिची लागवड करुन रेशीम उद्योग सुरू केलेल्या शैतकरी नारायण इंद्रजीत शिवकर यांचाही सत्कार करण्यात आला. अशा विविध क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विनोद मुसांडे, अनिल ओवांडकर, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, के.डि. पाटील, नगरसेवक विजयकुमार ढगे, शहर प्रमुख श्रीकांत भरारे, विजय नरगाळे, संजय नरगाळे, मनोज गवळी, मधुकर जाधव, नितीन मोरे, ग्रामपंचायत सदस्य नारायण माळी, युवराज जाधव, धर्मवीर जाधव, सुनील जाधव, तानाजी नरगाळे, सारंग गाटे, पांडु मुळे, गणेश कुलकर्णी, अनिल आतनुरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top