*धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईफ्तेकार शेख यांना पोलीस महासंचालक पुरस्कार प्रदान*
धाराशिव/प्रतिनिधी
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त पोलिस प्रशासनात उत्तम कामगिरी केल्याबद्दल धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
इफ्तेकार इलाही शेख यांना मा. पोलिस महासंचालक पुरस्काराने गौरविण्यात आले
पोलीस प्रशासनात उत्कृष्ट सेवा केल्या बद्दल देण्यात येणारा मा.पोलिस महासंचालक पुरस्काराने धाराशिव लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इफ्तेकार इलाही शेख यांना 15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षकश्री संदीप आटोळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छत्रपती संभाजीनगर चे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मुंकूद आघाव आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते