*विशालगढ जाळपोळ प्रकरण दंगेखोरांना अटक करा; मुस्लीम समाजाच्या वतीने निवेदन*
लोहारा/प्रतिनीधी
इकबाल मुल्ला
गजापूरवर हल्ला केलेल्या दंगेखोरांना अटक झालीच पाहीजे, महिलांवर हलाल करणाऱ्यांना अटक झालीच पाहीजे उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील सकल मुस्लीम समाजाच्या वतीने शुक्रवार(ता. १९) तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. स्वराज्य पक्ष, हिंदू राष्ट्र सेना या संघटना आणि पक्षाने विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. तरी सुद्धा मुळशी, मावळ पुणे, सातारा, कोल्हापूर, वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला व जमावला भडकवण्याचे काम सोशल मिडिया माध्यमातून केले गेले. आलेल्या जमावाने विशाळगडावर तसेच विशाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलमानवाडी व गजापुर गावात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समुदायाची घरे जाळणे, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून जखमी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, स्त्रिया व लहान मुले-मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे व जीवघेणा हल्ला करणे, स्थानिक रहिवासी असलेल्यांच्या घरातील मौल्यवान दागिने व वस्तू चोरणे व जबरदस्ती घरात घुसून तोडफोड करणे, मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ आणि मस्जिद यांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखवने. यांसारखी गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेली आहेत.
गडावरून परतताना गजापुरातील हल्ल्यामुळे नागरिकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, हल्ल्यात बाधीत झालेली धार्मिक स्थळे व घरांसाठी शासनाने नुकसान भरपाई द्यावी, हल्ल्यातील जखमी व्यक्तींना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारतर्फे द्यावी, मुस्लीम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ संमत करा, वरील घटनेची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नदीम मुजावर, हारून मुजावर, अझर पटेल, जाफर मुल्ला, जाहेद मुल्ला, जाकीर मुजावर, रहीम पटेल आदि उपस्थित होते.