Views


*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा - 2 अंतर्गत औसा मतदारसंघातील 39 किमी लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांसाठी 55 कोटी 85 लक्ष रु. निधी मंजूर -- आ.अभिमन्यु पवार*



लोहारा/प्रतिनीधी
इकबाल मुल्ला

ओशाचे आ.अभिमन्यु पवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा - 2 अंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघातील 39 किमी लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांसाठी 55 कोटी 85 लक्ष रु. निधीला प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. प्राप्त निधीतून मतदारसंघातील राममा 239 ते उंबडगा रस्ता (VR-17), राममा 548 B दावतपूर ते गाढवेवाडी रस्ता (VR-79), राममा 548 K ते तोंडोळी - होळी रस्ता (VR-33), बेलकुंड - हिप्परगा - कवळी ते मातोळा रस्ता (VR-89, VR-105), रामा 242 नागरसोगा गाढवेवाडी ते तळणी रस्ता (ODR-103, ODR-104) या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. आ.अभिमन्यु पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री गिरीशजी महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेले कासार सिरसी मंडळातील रस्ते सुद्धा मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याची माहिती आ. अभिमन्यु पवार यांनी दिली आहे.

 
Top