*आ.ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्यामुळे लोहारा शहरात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे -- नगराध्यक्षा सौ.वैशालीताई खराडे*
लोहारा/प्रतिनिधी
माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आ.ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महायुतीकडे) पाठपुरावा करून लोहारा शहरात मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणुन माझ्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विविध
विकास कामे झाली असल्याची माहिती लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. वैशालीताई खराडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. लोहारा नगरपंचायत कार्यालयात दि.30 जुलै 2024 रोजी नगराध्यक्षा सौ.
वैशालीताई खराडे यांनी पत्रकारिषद आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, उपस्थित होते.
लोहारा शहरात नाना नानी पार्क, नगरपंचायत नवीन इमारत, ग्रामिण रुग्णालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जेवळी रस्ता महात्मा बस्वेश्र्वर चौका पर्यंत मुख्य नाली, जुन्या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन कचरा करण्यासाठी कचरा डेपो,कंपाउंड वाल, अंर्तगत रस्ते, अग्नीशामक वाहन, अग्नीशामक वाहन लावण्यासाठी इमारत बांधकाम करण्यात आले. प्रभाग क्रं.11, 12 व 8 मध्ये लहान मुलांसाठी चिल्डृन पार्क तयार करण्यात आले. प्रभाग क्र.17, 5,11 व 12 मध्ये हायमस्ट लॅंप व नविन विद्युत पोल बसवुन त्यावर स्टेट लाईट बसविण्यात आले. शहरामध्ये नविन 11 अंगणवाड्या मंजुर करुन घेतल्या. व कांहीचे बांधकाम चालु असुन कांही पुर्ण झाले आहेत. शहरामध्ये राम मंदिर बांधकामासाठी 25 लक्ष निधी प्राप्त झाला आहे. विरशैव कक्कया स्मशानभुमी चे संरक्षण भिंत व दहन भुमीचे काम चालु आहे. लिंगायत स्मशानभुमी मध्ये स्टिट लाईट व सभागृह बांधकाम चालु आहे. स्मशानभुमी लांब असल्याने आमदार निधीतुन शव वाहिनी खरेदी करण्यात आली आहे. जुम्मा मश्जिद जवळ हुसेन बाशा सवारीसाठी सभागृह बांधकाम प्रस्तावित आहे. शहरामध्ये एकुण 41 विंधन विहिर त्यापैकी 36 बोअर आमदार निधीतुन घेण्यात आले. निम्ण तेरणा प्रकल्प माकणी येथुन शहरासाठी कायस्वरुपी योजणेसाठी 34.00 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. लोहारा शहरात सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याची दखल घेत महिलांसाठी, पुरुषासाठी सार्वजनिक शौचालय व मुतारीसाठी निधी मंजुर करुण घेतला आहे. या कामास लवकरच सुरुवात होईल. शहरात रस्ते व गटारी नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत होती. कांही प्रभागात सिमेंट रस्ते गटारी करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सदरील कामे मंजुर केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महायुती), माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले यांचे नगराध्यक्षा सौ. वैशालीताई खराडे यांनी आभार मानले आहे.