Views




*कळंब वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.भारत साठे तर उपाध्यक्षपदी ॲड अजिंक्य शिंदे तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. धनश्री कांबळे यांची निवड*

कळंब/ प्रतिनिधी

कळंब विधीज्ञ (वकील) बार असोसिएशन मंडळाचे 2024-2025 वार्षिक निवडणूकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव पदासाठी निवडणूक बार असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. या साठी पुरूष उपाध्यक्ष साठी ॲड.अजिंक्य राम शिंदे तसेच महिला उपाध्यक्ष पदा साठी ॲड. धनश्री अशोक कांबळे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोघांना बिनविरोध जाहीर करण्यात आले तर अध्यक्ष, ॲड.भारत बळीराम साठे व ॲड त्रिंबक भानुदास मनगिरे यांनी एकमेकांन विरूद्ध अर्ज दाखल केले होते तर
कोषाध्यक्ष पदासाठी ॲड.भगीरथ हरिभाऊ वाघमोडे व ॲड. दत्तात्रय सुंदरराव कवडे यांनी अर्ज दाखल केला होता तर सचिव पदासाठी ॲड.आनंद सुंदरराव लोमटे व ॲड.दिनेश मुकूंद पौळ यांनी अर्ज दाखल केला होता यासाठी मंगळवार (दि.30) रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून दुपारी 4:00 वाजेपर्यंत कळंब वकील बार असोसिएशनचे सदस्यांनी मतदान केले व 5:00 वाजता मतमोजणी करण्यात आली यावेळी अध्यक्ष पदासाठी ॲड.भारत बळीराम साठे यांना एकूण 66 मते पडली तर ॲड त्रिंबक भानुदासराव मनगिरे एकूण 62 असे मते पडली असे ॲड.भारत बळीराम साठे यांना अध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आले
कोषाध्यक्ष पदासाठी
ॲड भगीरथ हरिभाऊ वाघमोडे यांना एकूण 44 मते पडली तर ॲड दत्तात्रय सुंदरराव कवडे  यांना एकूण 84 मते पडली असे कोषाध्यक्ष म्हणून ॲड दत्तात्रय सुंदरराव कवडे यांना विजयी घोषित करण्यात आले
सचिव पदासाठी
ॲड आनंद सुंदरराव लोमटे  यांना एकूण 40 मते पडली तर ॲड दिनेश मुकुंद पौळ यांना एकूण 88 मते पडली असे सचिव म्हणून ॲड दिनेश मुकुंद पौळ यांना विजयी घोषित करण्यात आले यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.अमर ढेपे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. श्री जाधवर यांनी काम पाहिले यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे सर्व वकील बार असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा दिल्या व गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केला



 

















 
Top