Views


*बँकेने पीक कर्ज वाटप उद्दीष्ट वेळेत 
पुर्ण करावे -- आ.ज्ञानराज चौगुले*



लोहारा/प्रतिनीधी


उमरगा, लोहारा तालुक्यातील पिककर्ज व शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणातील अडचणी बाबत आज दि.29 जुलै 2024 रोजी तहसील कार्यालय, उमरगा व तहसील कार्यालय लोहारा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. याबैठकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्ज संबंधीच्या समस्यासंदर्भात सर्व बँक अधिकाऱ्यांना बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दीष्ठ लवकरात लवकर (100%) पूर्ण करण्यात यावे, शेतकऱ्याने पिक कर्जाचे पुनर्गठन करून घेतल्यानंतर लागलीच त्यांना 4 दिवसात कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे, KCC लोनसाठी सिबिल स्कोअरची अट रद्द करणे, पीक कर्ज देण्यासाठी इतर बँकाचे बेबाकी प्रमाणपत्र घेण्याऐवजी स्टॅम्प वरती शेतकऱ्याचे हमी पत्र घ्यावे, कर्जासाठी लागणारी कागदपत्रांची यादी दर्शनी भागात मोठा फ्लेक्स करून लावणे,गटसचिव यांनी तत्पर व कार्यशील राहणे गरजेचे, ऊसावरील kcc लोनसाठी कारखान्याचे पत्र घेण्याची अट रद्द करणे, KCC लोन परतफेड मुदत वाढवून ५ वर्षे करणे, ज्या शेतकऱ्यांचे KCC लोन थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाचे येणारे अनुदान बँक देत नाही त्यांना ते अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावे, पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे घालावे लागणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत सर्व पीक कर्ज वाटप करावे व गरजुवंत शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आ. चौगुले यांनी सांगीतले. पीक कर्ज वाटप करताना बॅंका दत्तक गाव असेल तर कर्ज वाटप करु असे सांगीत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी या बैठकीत केली. तात्काळ आ.ज्ञानराज चौगुले यांनी दखल घेत पीक कर्ज वाटप करताना बॅंकेने दत्तक गाव असेल तर कर्ज वाटप असे करु नका, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा, असे सुचित अधिकार्यांना केले. या बैठकीस उमरगा तहसीलदार गोविंद येरमे, लोहारा तहसीलदार काशीनाथ पाटील, उमरगा नायब तहसीलदार रतन काजळे, लोहारा नायब तहसीलदार सुजाता हंकारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, लोहारा गटशिक्षणाधिकारी शितल खिंडे, उमरगा गटशिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी प्रशांत मरूड, सहाय्यक निबंधक दत्ता मोरे, एसबीआय लीड बॅक मॅनेजर चिनमयदास, उमरगा
तालुका कृषी अधिकारी, लोहारा तालुका कृषी अधिकारी, अरूण जगताप, राजेंद्र माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अमिन सुंबेकर, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक विजयकुमार ढगे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, के.डी.पाटील, कुंडलीक सुर्यवंशी, सरपंच व्यंकट कागे, आयुब अब्दुल शेख, उपसरपंच बबन फुलसुंदर, यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व बँकाचे व्यवस्थापक, शेतकरी, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top