Views


*राष्टवादी कॉग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक जालिंदर भाऊ कोकणे*


लोहारा/प्रतिनीधी


राष्टवादी कॉग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी लोहारा शहरातील नगरसेवक जालिंदर भाऊ कोकणे यांची निवड करण्यात आली आहे. राष्टवादी कॉग्रेस जिल्हा संपर्क कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राष्टवादी कॉग्रेस पार्टी (उद्योग विभाग) सुभाष खु. मालपाणी व राष्टवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र (काका) धुरगुडे यांच्या हस्ते निवडीचे नियुक्ती जालिंदर भाऊ कोकणे यांना देण्यात आले. यावेळी उप जिल्हाध्यक्ष हाजी बाबा शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे धोरण व मार्गदर्शन तसेच खा. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे व राष्टवादी कॉग्रेस पक्षाची संघटना बांधणीकरीता आपली निवड करण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे. या निवडीबद्धल जालिंदर कोकणे यांचे परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top