Views



*मुस्लिम समाजाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयवर मोर्चा, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने विशालगड (कोल्हापूर) येथील घटनेचे निषेध करत निवेदन*



लोहारा/प्रतिनिधी 


विशालगड (कोल्हापूर) मुस्लिमवाडी व गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ लोहारा तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयवर दि.22 जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. मुस्लिमवाडी व गजापूर येथील घटनेचे निषेधार्थ सकल मुस्लिम समाजाच्या वतीने लोहारा शहर बंद, शहरातील व्यापारी बांधवांनी आपपाली दुकाने 100% बंद ठेवुन मुस्लिम समाजास दिला पाठिंबा. विशालगड येथील गजापुर मशिदीवरील समाजकटांनी बेकायदेशीर जमा गोळा करुण केलेल्या हल्याच्या निषेधार्थ आरोपीवर कठोर कार्यवाही करुण अधिकारी यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी करीत लोहारा येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दि.22 जुलै 2024 रोजी शांततेत मोर्चा काढून तहसीलदार काशीनाथ पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, दि 14 /7/2024 रोजी विशालगड कोल्हापुर येथे गडावरील अतिक्रमण उठविण्याच्या कारणावरुन जे आयोजित नियोजन करण्यात आले होते. त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याशी ज्या छोट्या-छोट्या गावात जातियवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्रीत येऊन गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करुण मुस्लिम महिला, लहान मुले, वृद्ध लोकांना अमानुषपणे मारहाण करुण त्यांची दुकाने, घरे, चार चाकी, दु चाकी वाहनांची जाळपोळ केली आहे. मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर या लोकांनी कट करुण धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणात नासधुस करुण धार्मिक स्थळाचे पावित्र नष्ट केले आहे. या घटनेचा लोकशाही मार्गाने आम्ही निषेध करीत आहोत. या घटनेस जबाबदार असणाऱ्या जातीयवादी संघटना व गुंड कार्यकर्त्यावर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
सकल मुस्लिम समाज लोहारा तालुका यांच्या वतीने दि.22 जुलै 2024 रोजी
रोजी लोहारा शहर बंदची हाक दिली होती. या बंद ला शहरातील व्यापारी बांधवांनी आपपाली दुकाने दिवसभर बंद ठेवून 100% प्रतिसाद देत शहरातील व्यापारी वर्गांनी ही मुस्लिम बांधवांच्या सोबत पाठिंबा दर्शविला
_______________________________
सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहे आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जमा होऊन तहसील कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजातील तरूणांसह व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडु नये यासाठी पो.नि. अजित चिंतळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, शब्बीर गवंडी, हाजी बाबा शेख, आयुब अब्दुल शेख, नगरसेवक गौस मोमीन, सलीम शेख, महेबुब गवंडी, इकबाल मुल्ला, आय्याज सवार, आब्बास शेख, दादा मुल्ला, नयुम सवार, शेरु मासुलदार, नजीर हड्डे, जहिर खुटेपड, खुनमिर मोमिन, निहाल मुजावर, शाहरुख गवंडी, आरबज फकीर, वसीम हेद्दे, फयाज नदाफ, अल्ताफ शेख, मोईज शेख, नोमान पठाण, आरबाज कमाल, साहिल शेख,सिराज सिद्दीकी, अन्वर कुरेशी, झमिर सावर, समद सुंबेकर, अल्ताफ सुंबेकर, मैनु बागवान, कैफ कुरेशी,नगरसेवक आरिफ़ खानापुरे, यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 
Top