Views


*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधा --आ.ज्ञानराज चौगुले*



लोहारा/प्रतिनीधी
इकबाल मुल्ला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधा, असे आवाहान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. तहसील कार्यालय उमरगा येथे शुक्रवार(दि.19 )रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व युवानेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत योजनेबाबत जनजागृती करणे, पात्रतेबाबत अनेक अटी शिथील झाले असून त्याबाबत सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना माहिती द्यावी, राखी पौर्णिमेंपर्यंत तालुक्यांतील किमान 50% महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देणे साठी प्रशासनाने युदधपातळीवर काम करावे, आधार कार्ड व बँक खाते क्रमांकाची अचूक नोंद घ्यावी. जेणेकरून महिलांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, त्रुटी आढळल्यास कागदपत्रांची पूर्तता करून घेवून त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी, एकही अर्ज नामंजूर होणारं नाही याबाबत दक्षता घ्यावी यावेळी अशा अनेक सूचना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना केल्या. यावेळी तहसिलदार गोविंद येरमे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, नायब तहसीलदार रतन काजळे, न.प.चे तुळशीदास व्हराडे, महिला व बालविकास चे वाघ सर, शहरप्रमुख योगेश तपासाळे, विधानसभा संघटक शरद पवार, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top