Views





*मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयवर मोर्चा*

*सकल मुस्लिम समाजाच्या वतीने विशालगड (कोल्हापूर) येथील घटनेचे निषेध करत काढला मोर्चा*

*मुस्लिमवाडी व गजापूर येथील घटनेचे निषेधार्थ सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कळंब शहर बंद*


*शहरातील व्यापारी बांधवांनी आपपाली दुकाने 100% बंद ठेव मुस्लिम समाजास दिला पाठिंबा* 

 
कळंब/ प्रतिनिधी 




विशाळगड,गजापुर येथे झालेल्या मुस्लिम वस्तिवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ आणि समाज कंटकांना कठोर शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन उपविभागीय कार्यालय कळंब यांच्या मार्फत देण्यात आले. 
सकल मुस्लिम समाज कळंब जिल्हा धाराशिव 
विशालगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मुस्लिमवाडी व गजापूर गावात असलेल्या मुस्लिम समुदायांची घरे जळणे, बंदोबस्तासाठी आलेली पोलिसावर जीव घेणे हल्ला करून जखमी करणे,शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, स्त्रिया व लहान मुले-मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे, जीवघेणे हल्ला करणे, स्थानिक रहिवासी असलेल्या घरात मौल्यवान दागिने व वस्तू चोरणे, व जबरदस्तीने घरात घुसून तोडफोड करणे, मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाचे तोडफोड करून धार्मिक भावना दुखावणे यासारखे गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेल्या आरोपी वर कारवाई करण्याची मागणी करत कळंब येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवार (दि.19) रोजी मोर्चा काढून कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयवर मोर्चा काढून मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले 
 
निवेदनात विशालगडा(कोल्हापूर)वर अतिक्रमण विरोधात रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी स्वराज पक्ष व हिंदू राष्ट्र सेना यांनी मोर्चाचे आयोजन केले. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती तरीसुद्धा महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून बेकायदेशीर पद्धतीने जमाव गोळा करून व जमावाला भडकवण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून केले गेले. आलेल्या जमावाने विशालगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मुस्लिमवाडी व गजापुर गावात असलेल्या मुस्लिम समुदायाचे घरे जाळणे, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर जीव घेणे हल्ला करून जखमी करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे स्त्रिया व लहान मुले मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे जीव घेणे हल्ला करणे स्थानिक रहिवाशांची घरातील मौल्यवान दागिने व वस्तू चोरणे व जबरदस्तीने घरात घुसून तोडफोड करणे मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाचे तोडफोड करून धार्मिक भावना दुखावणे यासारखे गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेले आहे तरी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने 
हिंसाचार व जाळपोळ करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर विरोधात कठोर कारवाई करावी 
गजापूर येथील हिंसाचार जे काही आर्थिक नुकसान तेथील नागरिकांचे झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची यावे
शेकडो वर्षापासून मुस्लिम समाजचे प्रार्थना स्थळे आहेत त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी
मुस्लिम समाजावर सतत होणाऱ्या अत्याचार विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यातून करावी करण्यात करावी 
सोशल मीडिया मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या आस्थेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडिओ बनवणाऱ्या व धार्मिक भावना दुखावणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी 
असे निवेदनावर मुस्लिम बांधवांनी स्वाक्षरी करून राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला 

चौकट 


सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. 19 )रोजी कळंब शहर बंदची हाक दिली होती या बंद ला शहरातील व्यापारी बांधवांनी आपपाली दुकाने दिवसभर बंद ठेवून 100% प्रतिसाद देत शहरातील व्यापारी वर्गांनी ही मुस्लिम बांधवांच्या सोबत पाठिंबा दर्शविला 


चौकट 


सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातून बागवान चौक, येथे जमा होऊन तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, होळकर चौक ,मार्गे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जमा होऊन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मुस्लिम समाजातील तरूणांसह व वयोवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते 








 
Top