*उपळा (मा) येथील सोयाबीन चोरीचे स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा लावत दोन आरोपी जेरबंद*
*चोरीच्या सोयाबीन सह एक पिकअप जप्त*
धाराशिव/प्रतिनिधी
तालुक्यातील उपळे (मा) येथील सोयाबीन चोरीचा छडा लावत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासात गुन्हे चा छडा लावून सदर कारवाई केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की उपळे (मा)येथील परीक्षित विक्रम पडवळ यांचे शाहूनगर ते उपळा गावात जाणाऱ्या रोडलगत असलेल्या गोडाऊन चे कुलूप तोडून चोरट्यांनी सोयाबीनचे 40 कट्टे किंमत 1 लाख 8 हजार रुपये चे सोयाबीन लंपास केले होते ही घटना 12 जुलै रोजी रात्री घडली होती या प्रकरणी पडवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीच्या व मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे तेर येथील दीपक तानाजी पवार व त्याच्या अन्य एका साथीदारास तेर येथून ताब्यात घेतले धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून चोरीचे सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप असा एकूण 3 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्या दोघांना अटक करून धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले
सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वल्लीवुल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, प्रकाश औताडे, चालक रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली