Views


* नम्रता काळेचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत यश*



कळंब/ प्रतिनिधी 

 


प्रोऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने जून 2024 ची नॅशनल समर कॉम्पिटेशन बीड येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील 850 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सपर्धेत विद्यार्थ्यांना 6 मिनिटात 100 गणित सोडवायची असतात. कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गावच्या नम्रता नितीन काळे हिने 5 मिनिट 13 सेकंदामध्ये 100 गणित सोडवले. नम्रताचे 100 पैकी 99 गणित बरोबर आले. कमी वेळात अचूक गणित सोडवल्यामुळे नॅशनल समर कॉम्पिटिशन मध्ये इयत्ता तिसरी मधून प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातून शहरात येऊन तिने हे यश संपादन केले तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे तिच्या या यशामागे कळंब मधील बहुचर्चित व नामांकित ब्रेन मास्टर प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या संचालिका सौ. रेशमा शिनगारे (सावंत) मॅडमचे बहुमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाले. ब्रेन मास्टर अबॅकस क्लासेसच्या एकूण 47 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी 43 विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त झाले. सर्व उत्कृष्ट कामगिरीसाठी ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस कळंबला बेस्ट सेंटर अवॉर्ड देखील प्राप्त झाला आहे.


 
Top