Views


*कळंब पोलीस ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने 190 वाहनांवर कारवाई*

*86 हजार 150 रूपयांचे दंड वसूल* 

*शैक्षणिक क्लासेस मध्ये अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी चा दुचाकीचा वापर* 

*कोचिंग क्लासेस परिसरात पाहायला मिळते अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी ची स्टंटबाजी* 
कळंब/ प्रतिनिधी 

शहरात मोटर सायकल परवाना नसलेले,ट्रिपल सीट, ओव्हरलोड तसेच अठरा वर्ष खालील मुलांना गाडी देणे. अशा विविध प्रकारच्या  खटले 190 वाहनांवर कळंब वाहतूक शाखेच्या वतीने एका महिन्यामध्ये दाखल केले त्यामध्ये एकूण 86 हजार 150 रूपये दंड केला

कळंब पोलीस ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने 190 वाहनांवर कारवाई केली  यावेळी मोटर सायकल परवाना नसलेले,ट्रिपल सीट, ओव्हरलोड तसेच अठरा वर्ष खालील मुलांना गाडी देणे . अशा विविध प्रकारच्या खटले  एका महिन्यामध्ये दाखल केले यावेळी एकूण 86 हजार 150 रूपये दंड केला 
सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशानुसार कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार ,कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राम बहुरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे , रवी कोरे यांनी कार्यवाही केली आहे.  

कोचिंग क्लासेस कडे ही वाहतूक शाखेच्या वतीने लक्ष देण्याची गरज शहरात तांदुळवाडी रोड, ढोकी रोडी, परळी रोड,काॅलेज परिसरात अनेक कोचिंग क्लासेस आहेत. क्लासेस ला येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आप -आपल्या पालकांचे दुचाकी घेऊन येता तसेच काही उनाड विद्यार्थी स्टंटबाजी करताना ही पाहीला मिळतात याकडे ही कळंब वाहतूक शाखेच्या वतीने लक्ष ठेवून कार्यवाही करावी अशी नागरिकांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत चौकट:- 


सर्व पालकांना कळंब पोलीस ठाणे वतीने आव्हान आपल्या अल्पवयीन पाल्यांना दुचाकी किंवा चारचाकी चालवण्यास देऊ नये अन्यथा शहरातील सर्व चौकामध्ये दररोज वाहन तपासणी करण्यात येत आहे या दरम्यान अल्पवयीन पाल्या आढळून आल्यास पालकास तर दंड वसूल करण्यात येईल 

रवी सानप 
पोलीस निरीक्षक कळंब पोलिस ठाणे  
Top