Views


*कोंबिग ऑपरेशन मध्ये 6 कुख्यात फरार आरोपी ताब्यात*

*धाराशिव पोलिस प्रशासनाचे कोंबिग ऑपरेशन*

धाराशिव/प्रतिनिधी 

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना रविवार (दि 03) रोजी पहाटे 4.00 ते सकाळी 9.00 वाजेच्या सुमारे कोंबिग ऑपरेशन करून वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीवरुन 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले

याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग वर चालत्या मालवहानातुन माल चोरीचे प्रकार वाढत आहेत. तसेच आगामी काळात निवडणूक, जयंती, सन उत्सव च्या अनुषंगाने धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीवर कोंबिग ऑपरेशन करून
 संतोष लाला काळे, 
प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, 
राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे, अभिजित उर्फ तावऱ्या शंकर पवार ,आर्यन उर्फ काळ्या अमोल काळे, 
विकास उर्फ बहिऱ्या मच्छिंद्र काळे, सर्व रा लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा ता. वाशी या आरोपींवर येरमाळा पोलीस ठाण्यात 395, 353,332,34 तसेच राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे यांच्या वर येरमाळा पोलीस ठाण्यात 394,427 भा.दं.वि.सं अन्वये गुन्हे मध्ये पोलिसांना पाहिजे होता. तसेच नळदुर्ग पोलिस ठाण्यात संतोष लाला काळे, याच्या वर 457,380 , 392 भा. दं. वि. सं अन्वये गुन्हे दाखल आहे ते गेल्या दोन तीन वर्षा पासून सर्व आरोपी पोलिसांना गुंगारा देत आले. 

सदर कुख्यात आरोपी हे लक्ष्मी पारधी पिढीवर असल्याचे पोलीस प्रशासनास सुगावा लागताच धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, व अप्पर पोलिस अधीक्षक गैहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक स्वप्नील राठोड,धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोलिस उपनिरीक्षक श्री. संदीप ओहोळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार- विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शैकत पठाण, फरहाण पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, अशोक कदम, सुनिल मोरे, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे, बबन जाधवर,मपोहे शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकासह आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व नियंत्रण कक्ष, धाराशिव येथील 6 पोलिस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलिस उपनिरीक्षक, 50 पोलीस अंमलदार,22 महिला पोलिस अंमलदार, 12 गृहरक्षक दलाचे जवान 11 सरकारी वाहने व त्यांच्या चालक यांनी कामगिरी बजावली 
 
Top