Views


*अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ*

*विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करावे*
धाराशिव /प्रतिनिधी 


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजाती, यामध्ये मांग,मातंग,मिनी मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी, मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी,मादगी व मादिगा या जातींचा आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना / उपक्रम राबवून दारिद्रय रेषेच्यावर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
              मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणिय वाढ झालेली आहे.त्यामुळे समाजातील गरजुंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे व महामंडळाचा उद्देश सफल व्हावा या अनुषंगाने महामंडळामार्फत कौशल्य विकास व उद्योजकता कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी / विद्यार्थींनी विविध प्रशिक्षणाकरिता १५ मार्चपर्यंत महामंडाळाकडे अर्ज दाखल करावे.असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.),डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेंट्रल बिल्डींगजवळ,धाराशिव येथे संपर्क साधावा.
                 
 
Top