Views


*रस्ता लुटीतील मुद्देमाल सह एक आरोपी ताब्यात*

*स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही* 


धाराशिव/प्रतिनिधी 


धाराशिव येथून हैदराबाद येथे अंत्यविधी साठी जात असलेल्या कुंटूबाला 3 फेब्रुवारी रोजी तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डानपुलाचे सर्व्हीस रोडचे कच्या रस्त्यावर हंगरगा शिवार येथुन फोर्ड फेस्टा कार क्र16 एटी 2393 ने शेख कुटुंब जात होते त्यांना कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 77,000₹ माल जबरीने लुटून पसार झाले होते. 
याची तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 40/2024 हा कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे याचा तपास तुळजापूर पोलिस करीत होते गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या तांत्रिक विश्लेशन व गोपनीय माहितीच्या आधारे मोहा, ता. कळंब येथील- गुड्या उर्फ प्रकाश शहाजी काळे, वय 21 वर्षे रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यास गुरूवार(दि 08) रोजी मोहा येथून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन असा एकुण 32,000₹ किंमतीचा माल हस्तगत केला. काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन या बाबत माहिती घेतली असता सदर बाबत पोलीस ठाणे येरमाळा येथे गुरन 49/2023 कलम 392, 34 भ.द.वि.सं. प्रमाणे गुन्हा नोंद असल्याबाबत खात्री झाली. आरोपी यास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
 सदर कार्यवाही ही धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी , अप्पर पोलिस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोलिस उपनिरीक्षक श्री. संदीप ओहोळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार- विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शैकत पठाण, फरहाण पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, अशोक कदम, सुनिल मोरे, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे, बबन जाधवर,मपोहे शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे.

 
Top