Views


*श्रुतिका बिभीषण यादव यांची शिल्प निदेशक या पदावर नियुक्ती*
कळंब /प्रतिनिधीमहात्मा फुले अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड कळंब व समता इंग्लिश स्कूल डिकसळ ता. कळंब च्या वतीने कुमारी श्रुतिका बिभीषण यादव यांची शिल्प निदेशक या पदावर नियुक्ती झाली,त्या धाराशिव येथील आय टी आय मधे रुजू झाल्या . यावेळी त्यांना पेढे भरून , त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी बँकेच्या संचालिका श्रीमती रेखा झांबरे अध्यक्ष स्थानी होत्या, यावेळी सूत्रसंचालन श्री.संतोष भोजने सर यांनी केले , यावेळी श्रुतिका ने आई वडील यांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले हे सांगितले , तसेच परीक्षेला कशा रीतिने सामोरे गेली हे सांगितले .सचिव अरुण माळी यांनी श्रुतिका ने घेतलेले कष्ट याबद्दल सांगितले,यावेळी अध्यक्ष प्रा .राजेंद्र खडबडे , उपाध्यक्ष बिभीषण यादव, सचिव अरुण माळी, प्रा.लालासाहेब धोंगडे, खरात सर,आर.के खडबडे, काळे सर,दोरगे सर ,शिंदे सर,सौ.जयश्री माळी,सौ.सुनीता यादव,अंकिता माळी व इतर सदस्य उपस्थित होते.

 
Top