*मोहेकर महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन*
कळंब/ प्रतिनिधी
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील प्रा. डॉ.अमरसिंह वरपे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार संगणक शास्त्रातील पदवी व पदवीत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे ऑपरेटिंग सिस्टीम या विषयावर सखोल माहिती देणाऱ्या पुस्तकाचे लिखाण केले. त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, यांच्या हस्ते दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आले. यावेळी डॉ. सुनील पवार, प्राचार्य. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, प्रोफेसर ज्ञानेश चिंते, डॉ.नागनाथ आदाटे, डॉ.नामानंद साठे,लेफ्टनंट डॉ.पावडे के. डब्ल्यू.,डॉ. संदीप महाजन, प्रा. दीपक वाळके,डॉ. श्रीकांत भोसले, अरविंद शिंदे सहाय्यक ग्रंथपाल,प्रा.राम दळवी, प्रा.बालाजी बाबर, हनुमंत जाधव,संदीप सूर्यवंशी आदी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.