Views


*मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर
कळंब मध्ये रस्ता रोको*


*मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा*


*टायर जाळून केले राज्य सरकार चे निषेध*



कळंब /प्रतिनिधी





 कळंब -परळी मार्गावरील मांजरा नदीवर मराठा बांधवांनी बुधवार (ता.१४) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे.मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले.

जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले आहे.कळंब हून येरमाळा,ढोकी कडे जाणाऱ्या शहरातील सर्व मार्गावर नाकाबंदी करत तब्बल २ तास आंदोलन करन्यात आले.
मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांचा कनेक्टिंग पॉईंट असलेल्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे .
याचा पाचवा दिवस आहे, अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच सोमवारी कळंब येथे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बंद पाळण्यात आला होता.
    आता सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी कळंब येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे हे आंदोलन दोन तास चालले.
     यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित आहेत. सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार मार्फत रज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन हे कळंब तहसील चे नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे, यांनी स्वीकारले यावेळी कळंब मंडळ अधिकारी टी.डी. मटके उपस्थित होते यावेळी कळंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांबळे, महीला सहाय्यक पोलिस निरीक्षक पुंडगे ,पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलिस नाईक युवराज चेडे,मयंदे , अंजान महिला पोलिस अंमलदार वाघमारे, कांबळे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी तैनात होता.

 
Top