Views


*आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन सन्मान*

धाराशिव /प्रतिनिधी 

 राजमाता जिजाऊ व माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त मराठा महिला मंचच्यावतीने १२ आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन शनिवार (दि.१३ ) रोजी सन्मान करण्यात आला.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात येणाऱ्या आव्हानाला परतवून परिस्थितीवर मात करून कुटुंबाला भरभक्कम आधार देणाऱ्या व समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आदर्श माता, आदर्श उद्योजिका व आदर्श व्यवस्थापिका यांचा‌ आयोजक मनिषा राखुंडे-पाटील यांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना शेख, मुक्ता लोखंडे यांच्या हस्ते हवालदार सरोजा शिंदे, डाॅ वृदाराणी विधाते, डाॅ अंजली बुरगुटे व सरोजा शिंदे, सुषमा दुगम, सीमा नवले, सुनिता म्हस्के, विद्या पडवळ, कविता काळे, मंदाकिनी माकोडे, वृंदाराणी विधाते,सुवर्णा काकडे, अनघा गोडगे, संगीता शेंडगे यांचा पुष्पगुच्छ व जिजाऊ सावित्री यांच्या कार्याचे पुस्तक देऊन तसेच फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

 
Top