Views

फोटो चालक दिनानिमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शपथ देताना निशिकांत शिंदे, विलास राठोड, बालाजी तोडकर, मधुकर शेवाळे आदी.





*चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्रा कडून चालकांचा सत्कार*





धाराशिव /प्रतिनिधी 

चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान रविवार (ता.१७) रोजी करण्यात आला.
अप्पर पोलीस महासंचालक (वा.) डॉ. रवींद्र सिंगल , पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, छ. संभाजीनगर डॉ.अनिता जमादार, पोलीस उपाधीक्षक महामार्ग सुरक्षा छत्रपती संभाजीनगर श्री. डीसले सर आदींच्या मार्गदर्शनाखाली चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा चालक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. सदर वेळी अल्प उपहाराचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे चालक व अधिकारी यांच्यामध्ये एक विश्वासाचे स्थान निर्माण झाल्याचे दिसून येते. 
           तसेच महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार व वाहन चालक यांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी डॉ.श्री विलास तोडकर, डॉ. सुरेश गंगावणे, डॉ.गरजे, डॉ. कांबळे सर्व नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी यांच्या कडून जवळपास ७२ वाहन चालक यांची तपासणी करण्यात आली. 
           तसेच राज्य परिवहन महामंडळ धाराशिव येथील चालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील चालक यांना चालक दिनानिमित्त शुभेच्छा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. तसेच वाहन चालक व महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत शपथ देण्यात आली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव चे निशिकांत शिंदे यांनी दिली. 










 
Top