Views





*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हिप्परगा (रवा) येथील हुतात्मा स्मृतीस्तंभ पूजन*

 *लोहारा येथे जिल्हा स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 


मराठवाडा मुक्ती संग्राम सन 2022- 23 या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने शाळा स्तरावर प्रभात फेरी काढणे, शालेय परिसर स्वच्छता, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, मराठवाडा मुक्ती दिन गीत गायन तसेच शाळा स्तर, केंद्र स्तर व तालुकास्तरावर विद्यार्थ्याच्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्याचे नियोजन केलेले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैद्राबाद मुक्ती संग्रामामध्ये फार मोठे योगदान आहे. हिप्परगा रवा ता. लोहारा येथील राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. याचे औचित्य साधून जिल्हा स्तरावरील शिक्षण परिषदेची सुरुवात हिप्परगा (रवा) येथील हुतात्मा स्मृती स्तंभास मा. डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, मा. श्री. राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. उस्मानाबाद व मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक तसेच स्वातंत्र सैनिकांच्या वतीने अभिवादन दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सप्तरंग मंगल कार्यालय लोहारा येथे शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक / कुटुंबीय यांचे सत्कार व अनुभव कथन सोबत इतिहासकार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील शिक्षण परिषदेमध्ये निपुण भारत अंतर्गत FLN. NAS परीक्षा व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिक्षण परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना आमंत्रित केलेले आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) सुधा साळुंके यांनी केले आहे.

 
Top