Views


*स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार फरहान पठाण यांचा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान*




धाराशिव/ प्रतिनिधी 

जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यामध्ये मागील काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढलेल्या होत्या. तरी गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन एक आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून  त्याचे साथीदार निष्पन्न करुन धाराशिव जिल्हा व बाहेरील एकूण 26 घरफोड्या उघड करून त्यामध्ये एकूण 23 तोळे सोने एकूण किंमत 9,44,617 रुपयेचा  मुद्देमाल हस्तगत करून जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून जनसामान्यात  जिल्हा पोलिस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात अतिशय मोलाचे योगदानाबदल धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंगेकर, पवार, ओव्हाळ,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काझी,पोलिस हवालदार शौकत पठाण, फरहान पठाण, पोलिस नाईक बबन जाधवर,  जावेद काझी, संदिप औताडे, महिला पोलिस नाईक शैला टेळे,  यांची उल्लेखनीय कामगिरीबद्दल व योगदानाबद्दल धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पूर्ण टीम चे  धाराशिव चे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिना निमित्त विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले या बद्दल जिल्हाभरात स्थानिक पोलीस गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे. विशेष पोलीस हवालदार फरहान पठाण यांचे सन्मान करण्यात आला यावेळी धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हापरिषद चे मुख्याधिकारी राहुल गुप्ता, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते 

 
Top