Views


*हासेगाव (के) - तांदुळवाडी शिवरस्ता दुरुस्त करण्याची मागणी* 

कळंब /प्रतिनिधी


तालुक्यातील हासेगाव (के) - तांदुळवाडी शिवरस्ता मागील वीस वर्षांपासून दुरुस्त करण्याची मागणी होती. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिले नव्हते, अखेर शेतकऱ्यांनी लोकसहभागातून दोन किमी शिव रस्त्यावर मुरुम टाकुन रस्ता बनवला आहे. 

काळानुसार शेती ही आधुनिक होत चालली आहे. शेतकरी नवनवीन प्रयोग शेतात करुन भरीव उत्पन्न घेत आहेत. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्याची गरज आहे, मात्र या शेत रस्त्यावर अतिक्रमण व रस्ते खराब झाले आहेत. अनेक वेळा मागणी करुण सुध्दा याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी हताश होतात. कळंब तालुक्यातील हासेगाव (के) - तांदुळवाडी शिवरस्ता आहे. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता करण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नव्हते, जेष्ठ ग्रामस्थ चंद्रकांत धुमाळ, राजेंद्र चौरे व ग्रामपंचायत सदस्य रामलिंग धुमाळ यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील यांच्याकडे हा रस्ता करण्याची चर्चा केली असता, पाटील यांनी तात्काळ पोकलेन व इतर वाहणे उपलब्ध करुण दिली, रामलिंग धुमाळ यांनी गावातील ट्रॅक्टर मालकांनी स्वताचे वाहन देण्याची विनंती केली आणि सर्व तयार झाले आणि तब्बल २४ तासात लोकसहभागातून मुरुम व विहरीवरील खरपण टाकुन रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले. 



चौकट 

तालुक्यातील हासेगाव (के) जवळून हासेगाव (के) - तांदुळवाडी शिवरस्ता कडे जाण्यासाठी शिवरस्ता आहे. मात्र पावसाळ्यात या ठिकाणाहून जाता येत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दहा किमी म्हणजे तांदुळवाडी या गावातुन जावे लागत होते. शिव रस्त्यावर मुरुम टाळण्यात आला आहे.




चौकट 


हासेगाव (के) येथील ग्रामस्थांनी हासेगाव (के) - तांदुळवाडी शिवरस्ता करण्यात यावा अशी मागणी आहे. या रस्त्यावर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे लोकसहभागातून दोन किमी रस्त्यावर मुरुम व खरपण टाकुन मजबुतीकरण करण्यात आले आहे.

 
विलास पाटील 
(संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब
 
Top