Views


*छेडछाडीविरूध्द जागृती*

*पिंक पथकाचे मार्गदर्शन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

भुम तालुक्यातील सावरगाव (द) येथील बहादुर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनीना भुम पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पिंक पथकातील पोलिस नाईक प्रतिभा मते यांनी रोडरोमिओ बाबत मार्गदर्शन केले. येथील भूम पोलिस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वर्गाच्या छेडछाडीला पायबंद घातणे आणि प्रत्येक महिलांना भयमुक्त वातावरणात वावरता यावे म्हणून पोलिस दलाचे स्वतंत्र पिंक पथक गठीत करण्यात आले आहे. विविध उदाहरणासह पोलिस अशा प्रकारच्या गुन्हायांसह स्वरूप सांगत आहेत.

शाळा, काॅलेज , कोचिंग क्लासेस, सुटल्यावर रोड रोमियो मुलींना छेडछाड करणारे टवाळखोर हे विद्यार्थीनींना छेड काढणे, शाळेच्या गेट समोर उभा राहून छेड काढणे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पिंक पथक विविध शाळा, कोचिंग क्लासेस,बसस्थानक,अशा विविध ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. यावेळी मुख्याध्यापक जाधव, शिक्षक गवारे, मुळे नलवडे, समाधान जाधव उपस्थित होते.


चौकट

सावरगाव (द) येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनीना पिंक पथकातील महिला पोलिस नाईक प्रतिभा मते यांनी शाळांतील विद्यार्थीनींना बॅड टच आणि गुड टच या बाबत माहिती दिली. तसेच मुलींना त्यांच्या समस्या बाबत विचारपूस करून त्यांना शाळेत येतांना किंवा जाताना रस्त्याने व ईतर व इतर ठिकाणी त्रासाबाबत चर्चा करून छेडछाडीच्या संदर्भात काही त्रास असेल तर भूम पोलिस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ तसेच पिंक पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक जगताप, पोलिस नागटिळक महिला पोलिस नाईक प्रतिभा मते यांच्याशी 98 22 40 64 96, 99 22 76 27 97 या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा आवाहन केले 



 
Top